एका झाडाचे वार्षिक मूल्य ७४ सहस्र ५०० रुपये, तर १०० जुन्या झाडाचे मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक ! – सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीची अहवाल

सरकारने आता समुद्र, तसेच रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. वृक्षतोड अल्प प्रमाणात होईल, अशा प्रकल्पांना सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.

सीना नदीपात्रातून वाळूउपसा करणारे २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त

सीना नदीपात्रात अनधिकृतपणे राजरोसपणे वाळूउपसा चालू आहे. बीड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आष्टी तालुक्यात येऊन टाकळसिंग जवळच्या सीना नदीपात्रात धाड टाकून २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !

गिरगाव चौपाटी परिसरातील वडाचे झाड तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी 

गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस

‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

सर्व आदेश धाब्यावर बसवून नायलॉन मांजाची खुलेआम विक्री

नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात, तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो !

किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद

महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !

ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला अखेर शासनाकडून टाळे

उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.