किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद

महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !

किल्ले वासोटा

सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – गिर्यारोहकांना खुणावणारा आणि सातारा जिल्ह्याची शान असलेला किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद असणार आहे, अशी माहिती बामणोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनीस यांनी दिली.

 

ख्रिस्ती नववर्षारंभी अनेक हुल्लडबाज युवक किल्ले वासोटा येथे मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात. याला आळा बसावा यासाठी प्रतिवर्षी डिसेंबरच्या शेवटी किल्ले वासोटा पर्यटनासाठी ३ दिवस बंद ठेवण्यात येतो. या वर्षीही ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत किल्ले वासोटा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या गाभाक्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी वनक्षेत्रपाल हसबनीस यांनी दिली.