सीना नदीपात्रातून वाळूउपसा करणारे २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची आष्टी तालुक्यात मोठी कारवाई

प्रतिकात्मक चित्र

कडा (जिल्हा बीड) – सीना नदीपात्रात अनधिकृतपणे राजरोसपणे वाळूउपसा चालू आहे. बीड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आष्टी तालुक्यात येऊन टाकळसिंग जवळच्या सीना नदीपात्रात धाड टाकून २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यामध्ये बाळू तुकाराम देवकते, सुभाष बाळासाहेब वाल्हेकर, श्रीराम ज्ञानदेव जगताप, गणेश सुनील श्रीगंधे यांच्यासह६ वाहनमालक अशा १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.