ऐन दिवाळीत महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता !

ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात १ ते ३ नोव्हेंबर या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनुसार राज्यात २ ते ४ नोव्हेंबर या काळात ढगाळ हवामान राहील.

तळजाई टेकडीवरील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही ! – शिवसेना उपनेते सचिन अहिर

शहरांचा विकास करतांना निसर्गामधील विविध घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता त्याची काळजी घ्यायला हवी. तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचा महत्त्वाचा भाग असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही.

पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचे अमेरिकेत आयोजन !

मूळच्या नगर येथील असलेल्या डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेतील केंटकी राज्यामध्ये पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवले. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण माती आणि माणसं’ या विषयाला धरून त्यांनी पर्यावरणविषयक काम चालू केले आहे.

विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न केल्यास विनाश अटळ ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानात सातत्याने होणारे पालट, ही धोक्याची घंटा आहे. विकास प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न झाल्यास विनाश होऊ शकतो.

लुधियाना (पंजाब) येथील एका बेकरी व्यावसायिकाने ‘इको फ्रेंडली’ म्हणून बनवली चॉकलेटची श्री गणेशमूर्ती !

गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.

‘कागदामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबत नसून पर्यावरणाची हानी होते’, हे माहीत नसलेले शिल्पकार !

रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आय.सी.टी.) केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलो कागदाची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते.

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची पाक आणि चीन यांना चेतावणी !

संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी अ‍ॅप ‘कू’च्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !

राज्यातील ७७ टक्के पीकक्षेत्रावर वातावरण पालटाचा परिणाम !

चक्रीवादळे, पूर, पावसाचे पालटते ‘पॅटर्न’ आणि तीव्र तापमान पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे