‘कागदामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबत नसून पर्यावरणाची हानी होते’, हे माहीत नसलेले शिल्पकार !

कागदाच्या लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती

एका वृत्तपत्राच्या वार्ताहराला एका शिल्पकाराने सांगितले, ‘‘मूर्तीचे घरच्या घरी लवकर विघटन होण्यासाठी, पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून टिकाऊ श्री गणेशमूर्तींची निर्मिती आमच्या कारखान्यात केली जाते. घरात कायमस्वरूपी मूर्ती ठेवण्यासाठी कागदापासून बनवलेल्या मूर्ती उपयुक्त ठरतात. विघटन केल्यानंतर सिद्ध झालेल्या खताचा झाडांच्या वाढीसाठी उपयोग होतो.’’

या संदर्भातील योग्य दृष्टीकोन येथे देत आहोत.

  • रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आय.सी.टी.) केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलो कागदाची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते. त्यामुळेच पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी आणली आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पर्यावरणाचा र्‍हास कसा थांबवू शकतात ?
  • कागदामध्ये सात्त्विकता आकृष्ट होत नाही. कागद हा रजोगुणी असतो. त्यापेक्षा माती सात्त्विक असते. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार मातीची मूर्ती असणे योग्य आहे.
  • शास्त्रानुसार गणेशचतुर्थीला प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तींचे विसर्जन करायचे असते. त्यामुळे ती घरात कायमस्वरूपी ठेवणे चुकीचे आहे.
  • कागदाच्या खताचा झाडाला उपयोग कसा होईल ?