पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचे अमेरिकेत आयोजन !

पुणे – मूळच्या नगर येथील असलेल्या डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेतील केंटकी राज्यामध्ये पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवले. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण माती आणि माणसं’ या विषयाला धरून त्यांनी पर्यावरणविषयक काम चालू केले आहे.

अमेरिकेत नवरात्र महोत्सवानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना आंब्याचे रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. डॉ. तोडमल यांनी पर्यावरण या विषयामध्ये ‘पी.एच्.डी.’ केली आहे. अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांसमवेत काम करत त्यांनी पर्यावरणविषयक चळवळ चालू ठेवली असून महिला बचत गटांच्या माध्यमातून त्या पर्यावरण संवर्धनाचा विषय सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य त्या करत आहेत.