चिमण्या वाचवा !

निसर्गातील प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म जिवाचे नैसर्गिक जीवनचक्र चालवण्यात मोठा वाटा असतो. यामुळे आपणही उन्हाळ्यात चिमण्यांसाठी आगाशीत पाणी ठेवूया. त्यांच्यासाठी घरटे, खाद्य ठेवू शकतो. मुख्यतः आपली प्रगती म्हणजे दुसर्‍या जिवाची, निसर्गाची अधोगती करणे नव्हे !

वन्यजिवांचे रक्षण आणि संवर्धन

१. वन्यप्राणी वनांचे आणि वने प्राण्यांचे रक्षण करतात !…. २. हिंदु धर्म आणि अध्यात्म यांमध्ये वने, वृक्ष अन् वन्य प्राणी हेसुद्धा श्रद्धेचे विषय अन् आदरणीय आहेत !…. ३. हिंदु धर्मातील सण-उत्सव, प्रथा, परंपरा यांना पर्यावरणविरोधी म्हणणारे, हे लक्षात घेतील का ?….

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !

रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !

कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !

महापालिका क्षेत्रात २० प्रभागांत ‘हेरिटेज’ वृक्षांची गणना चालू !

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ‘हेरिटेज’ (जुन्या) वृक्षांची गणना चालू करण्यात आली आहे.

ईश्वराची मानवाला मिळालेली दैवी देणगी : वनस्पती !

१३ नोव्हेंबर या दिवशीच्या सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखाद्वारे वनस्पतीच्या प्रतिसादाच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊया.

तळजाई टेकडीवरील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही ! – शिवसेना उपनेते सचिन अहिर

शहरांचा विकास करतांना निसर्गामधील विविध घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता त्याची काळजी घ्यायला हवी. तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचा महत्त्वाचा भाग असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही.

पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचे अमेरिकेत आयोजन !

मूळच्या नगर येथील असलेल्या डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेतील केंटकी राज्यामध्ये पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवले. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण माती आणि माणसं’ या विषयाला धरून त्यांनी पर्यावरणविषयक काम चालू केले आहे.

‘तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ ! – कु. अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

‘तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ असणार आहे. हा पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतो. तो अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे.