१३ नोव्हेंबर या दिवशीच्या सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखाद्वारे वनस्पतीच्या प्रतिसादाच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊया.
मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/526761.html
११. वनस्पतीतील जैविक क्रिया, ही देवाचीच शक्ती !
निसर्ग ही देवाची शक्ती आहे, हे वनस्पतीतील जैविक क्रिया पाहून लक्षात येते. त्याविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी ती अल्पच आहे.
११ अ. मुळांना दिलेले पाणी वनस्पतीच्या पाना-फुलांपर्यंत ईश्वरच पोचवतो.
११ आ. प्रकाशसंश्लेषण क्रियेत साखर निर्माण होते. प्रकाशसंश्लेषणात कार्बन डायऑक्साइडचा उपयोग वनस्पती प्रकाशाच्या साहाय्याने करतात आणि ऑक्सिजन सोडतात. येथे साखर निर्माण होते, ही ईश्वराची किमयाच आहे. ‘कसकुटा’ नावाची वनस्पती ऑक्सिजन देत नाही, हेही आश्चर्यच आहे.
११ इ. वनस्पती ऑक्सिजनची देवाणघेवाण करतात ! : वनस्पतीच्या श्वास-उच्छ्वास क्रियेत ऑक्सिजनचा उपयोग होऊन साठवलेल्या साखरेमधून ऊर्जा मिळते आणि कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. वनस्पती दिवसा ऑक्सिजन (प्राणवायू) देतात, तर रात्री वनस्पती ऑक्सिजन (प्राणवायू) घेतात आणि कार्बन डायऑक्साइड (Co2) सोडतात. वनस्पती श्वासाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साईड दिवसाही सोडतात.
११ ई. हिंदु धर्मात वनस्पतीला महत्त्व असणे : प्रत्येक मनुष्य प्रत्येक दिवशी ५५० लिटर प्राणवायू घेतो. प्रत्येक दिवशी पावणेचार किलो वाढ होणारी वनस्पती असेल, तर तेवढ्या प्राणवायूची पूर्तता करू शकते. म्हणूनच हिंदु धर्मात वनस्पतीला महत्त्व दिले आहे. (वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।) देव निसर्गाची केवढी उलाढाल करतो, हे लक्षात येते. तुळशीच्या वनस्पतीतून घरबसल्या सतत प्राणवायू मिळतो. पृथ्वीतलावर २८ टक्के प्राणवायू वनस्पतीमुळे मिळतो.
११ उ. वनस्पतींनी कार्बन डायऑक्साईडचे शोषण करणे, हे मानवाला मिळालेले वरदान ! : वनस्पती तोडल्यानंतर ती जाळतात किंवा सडतात. त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. म्हणून झाडे तोडू नयेत आणि नवीन झाडे लावावीत. वनस्पती पूर्ण आयुष्यात जेवढे कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यातील अर्धे सोडतात, म्हणजे ईश्वराने निर्मिलेले झाड किती महत्त्वाचे आहे, ते लक्षात येईल. प्रत्येक वर्षी ४० बिलियन टन कार्बन डायऑक्साइड मनुष्यनिर्मित आहे. त्यापैकी ५० टक्के प्रमाण वनस्पतीमुळे शोषले जाते. ईश्वराने मानवास दिलेले हे वरदानच आहे.
११ ऊ. वनस्पतीची मुळे मज्जातंतूंप्रमाणे कार्य करतात ! : प्राण्यात संवेदना कळण्यासाठी मज्जातंतूचा उपयोग होतो. वनस्पतीमध्ये ‘ग्लुटॅमेट’ (Glutamate) आकलक असतात. ही वेगळी रचना कशी केली ? हे गूढ आहे. त्यातून संवेदना पोचते, ही ईश्वराची करणीच आहे. स्टीफॅनो मक्कुसो (वर्ष २००५) याने शोधले की, मुळामध्ये संदेशाचे कार्य आकलन हे मज्जातंतूप्रमाणे कार्य करतात; पण ते आश्चर्यच आहे. ‘डार्विन म्हणतो की, मुळाचे टोक मेंदूप्रमाणे कार्य करते. त्या टोकास ‘मेरिस्ट्रेम’ (meristrem) म्हणतात; पण आश्चर्य हे वाटते की, देवाने मेंदू इवल्याशा जागेत कसा समाविष्ट केला आणि कार्यप्रणाली पूर्ण झाडापर्यंत कशी वाटचाल करते ? मी त्यास नमन करतो.’ वनस्पतीची मुळे ते फांद्यांचे टोक असा किंवा उलट संदेश वहन होतो.
११ ए. निसर्गाचा निर्माता असलेल्या ईश्वराने निर्मिलेल्या वनस्पती, ही किमया ! : फळ पिकण्याची क्रिया होईपर्यंत वनस्पती त्याला सांभाळून ठेवते. चिबूड सारखे फळ त्याचा वरील पापुद्रा पातळ असून जीवाणू, विषाणू यांपासून निसर्ग त्याचे रक्षण करतो. त्यामुळे फळातील आतील गाभा सुरक्षित कसा रहातो ? नारळाच्या आत पाणी कसे काय रहाते ? ३० ते ४० फुटांपेक्षा अधिक उंचीवर शहाळे असतात, तेथे स्वच्छ आणि निर्मळ नारळाचे पाणी सुरक्षित कसे काय रहाते ? यात शुक्रजंतूसारखे जीव जरी ठेवले, तरी ते काही घंटे जीवित अवस्थेत राहू शकतात. हे ईश्वराविना कोण करणार ? झाडाच्या सालीतून अन्नद्रव्य वृक्षास पोचवतांना पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असला, तरी काही होत नाही. उष्ण आणि बर्फाळ प्रदेशात वृक्ष तटस्थपणे उभे रहातात. मनुष्य अडचणींपासून दूर जातो, तर वनस्पती त्याच अडचणींतून मार्ग काढते; कारण ती अचल आहे. संकटावर मात करणे, हा गुण यातून आपण घेऊ शकतो. झाडाची फळे एकाच वेळेस पिकायला येतात, ही ईश्वर करणी एक वरदानच होय. वनस्पती सर्व समान असतात. ज्यात उगवतात, ती मातीही एकसारखीच असते, तरी चंदनाचा सुगंध, वेगवेगळ्या फळांना वेगळा सुगंध, वेगळी चव, फुलांच्या आकर्षक रंगीबेरंगी रचना, वेगवेगळा सुगंध ही सर्व किमया पाहून देवाविषयी आम्हाला कृतज्ञता; पण व्यक्त होत नाही, हे आश्चर्य !
प्रत्येक ठिकाणी निर्माता लागतो, मग निसर्गाला निर्माता असतो, हे मनुष्याच्या बुद्धीला का पटत नाही ? येथेच सर्वसाधारण बुद्धी आडवी येते. ईश्वराने ‘फेनोमेन’ तरी कसे निर्माण केले ? डोजर परजिवी आहे; पण तो यजमान वनस्पती कसे काय निवडतो ? ही बुद्धी त्यास कोण देतो ? गवत कापतात, तेव्हा (लॉन करण्याच्या वेळी) एक रसायन सोडते. त्यास विशिष्ट वास असतो. त्यातून ते जवळच्या वनस्पतीस धोक्याची सूचना देतात. वनस्पतीला (वेली) स्थुलातील डोळे नसूनही त्या इतर गोष्टींचा आधार घेऊन वाढीस लागतात. सूर्यफुल सूर्याच्या दिशेकडेच असते. वनस्पती ऑक्सिजनमुळे सूर्याच्या दिशेला वळतात आणि वाढीस लागतात; पण हे क्षणोक्षणी घडूनसुद्धा त्या निसर्गाची किमया आपल्या लक्षात येत नाही. लाजाळू वनस्पतीला स्पर्श केल्यानंतर तिची पाने मिटतात, ते पोटॅशियम आयान्समुळे; पण देव तेच तेथे कसे पोचवतो ? पुन्हा ते पूर्वपदावर आणण्यासाठी अनैच्छिकरित्या क्रिया कशी घडते ?
१२. बुद्धीजीवी मनुष्य वनस्पतींमधील देवत्व जाणत नसणे
वनस्पती वेगवेगळ्या वातावरणात म्हणजेच पाणी, हवा, अंधार आणि प्रकाश यांमध्ये वाढतात. काही बुरशीजन्य, तर काही खुरट्या आहेत, तर काही वेली आणि काही वृक्षरूपात आहेत. एवढे असून त्या बिजाने उगवतात. त्यांची कलमच्या माध्यमातूनही लागवड करता येते. तुळशी, औदुंबर, वड, पिंपळ यांत दैवी तत्त्व असते. काही दिवसांपासून ते सहस्रो वर्षांपर्यंत त्यांचे अस्तित्व जिवंतरूपात कायम आहे. ‘गयेचा वटवृक्ष मोगलांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण अजून तो कायम आहे. तरीही तो ‘अक्षयवृक्ष’ आहे’, हे बुद्धीजीवी जाणत नाहीत आणि मानत नाहीत. मंदारचे वृक्ष १२ वर्षे वाढल्यास त्यांच्या मुळाशी ‘गणेशा’चा आकार सिद्ध होतो, हे कळूनसुद्धा ते संशोधन वृत्तीने जाणून घेत नाहीत. आपण दुर्लक्ष करतो; कारण त्यातील दैवत जाणण्याची जिज्ञासा आपल्यामध्ये नाही.
१३. निसर्गाचे संतुलन राखण्यात वृक्षांची महत्त्वाची भूमिका !
निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. हरितद्रव्यामुळे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) होते. त्यातूनच प्राणी आणि मनुष्य यांसाठी वनस्पतीजन्य शाकाहारी खाद्य निर्माण होते. वनस्पतीत हरित भाग, फांद्या आणि पाणी पाहिले, तर ५८ ते ६७ टक्के या प्रमाणात असते. यातून खाद्य आणि प्राणवायू मिळतोच; पण जमिनीचा कस टिकून रहातो. ही योजना कोण साकार करतो ? हेही आम्ही जाणले नाही. आमचे छत्रही वृक्षापासूनच निर्मित असते. आम्ही तेही जाणले नाही. आम्ही कृतघ्नच आहोत.
१४. वनस्पतीतील दैवी स्मृती
वनस्पतीत जी स्मृती देवाने दिली, ती रोग प्रतिकार आणि पिढ्यांमधील गुणदर्शक करण्यासाठी या प्रकारची आहे. हे सर्व आहे म्हणूनच वनस्पती टिकून आहेत. वांग्याच्या बियांतून मिरचीचे झाड उगवत नाही, दोन्ही बिया सारख्याच दिसतात. हा अद्भुत प्रकार वनस्पतीत पहाण्याचे भाग्य गुरूंनी मला दिले, म्हणून मी कृतज्ञ आहे.’
– डॉ. अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२०)
(समाप्त)