सांगली – ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ‘हेरिटेज’ (जुन्या) वृक्षांची गणना चालू करण्यात आली आहे. ही गणना २० प्रभागांत करण्यात येणार असून यात १३ नोव्हेंबर या दिवशी ४३० ‘हेरिटेज’ वृक्षांची गणना करून त्या वृक्षांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्यात आले. ‘जिओ टॅगिंग’मुळे हे वृक्ष ‘गूगल मॅप’वर दिसणार आहेत. ही गणना १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.