यवतमाळ येथे ‘रेमंड युको डेनिम डिव्‍हिजन’मध्‍ये प्रथमोपचार शिबीर !

या वेळी त्‍यांनी हृदयाविकाराचा झटका येणे, चक्‍कर येऊन पडणे, सर्पदंश होणे, शरिराला इजा होऊन रक्‍तस्राव होणे यावर प्रात्‍यक्षिकांसह मार्गदर्शन केले

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुनर्वसन कागदावरच ?

भूस्‍खलन आणि डोंगर खचण्‍याच्‍या घटना आताही घडत आहेत. या निमित्ताने प्रशासनाने पूर्वीच्‍या बाधित झालेल्‍या कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे ना ? याचा आढावा घ्‍यावा. यासाठी कालबद्ध कृतीशील कार्यक्रम आखावा, अन्‍यथा नेहमीप्रमाणे घोषणा केवळ कागदावरच, असे म्‍हणावे लागू नये !

गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले

गोव्यात पावसाने आता २ सहस्र मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे आणि २०.५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांखळीमध्ये सर्वाधिक १७१.६ मिमी पाऊस पडला. त्यानंतर पेडणे, म्हापसा, पणजी आणि काणकोण यांचा क्रमांक लागतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.

लेबेनॉन आर्थिक संकटात, ९० टक्के जनतेकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत !

सर्वत्र लूटमारीची स्थिती पहायला मिळत आहे. सामान्य जनता बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जाते; परंतु त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. बँकांकडे लोकांना त्यांचे पैसे देण्यासाठीही पैसे नाहीत. लोक बँकाही लुटू लागले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला !

पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ८७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ११३ मि.मी., तर पेडणे येथे ११०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

१७-१८ जुलैला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  

मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.