सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

जीवित आणि वित्त हानी नाही

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, माडखोल, पुळास, धवडकी या गावांत २९ जुलै या दिवशी रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भूकंपाच्या अधिक माहितीसाठी National Center For Seismology चे https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq हे ‘ॲप’ डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.