‘प्रथमोपचार – काळाची आवश्यकता !’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन !
यवतमाळ, ८ ऑगस्ट (वार्ता.) – आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा दैनंदिन कामे करतांना एखाद्याचा अपघात झाल्यास त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वी प्रथमोपचार केल्यास त्याचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रथमोपचारसेवक श्री. विजय जाधव यांनी केले. ते ‘रेमंड युको डेनिम डिव्हिजन’, लोहारा येथे घेण्यात आलेल्या ‘प्रथमोपचार – काळाची आवश्यकता !’ या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.
या वेळी त्यांनी हृदयाविकाराचा झटका येणे, चक्कर येऊन पडणे, सर्पदंश होणे, शरिराला इजा होऊन रक्तस्राव होणे यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले, तसेच छातीदाबन करणे, ‘एबीसीएबी’ उपचारपद्धती, जीवनाडी तपासणे, रक्तस्राव न्यून होण्यासाठी संबंधित भागाचे बिंदूदाबन करणे याविषयीची माहिती सांगितली, तसेच कामगारांच्या शंकांचे निरसन केले. या शिबिराचा लाभ एअरजेट गामा विभागातील ५२ कामगार, तसेच कर्मचारी यांनी घेतला. या वेळी विव्हिंग विभागाचे सर्वश्री विश्वजित पाटील, अनंत चौधरी, विलास डगवार, विशाल टेकाडे, ज्ञानेश्वर तसरे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.