लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !

२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

राज्यात प्रथमच निवडणुकीच्या कामांत डॉक्टरांना नेमण्यात येणार !

मुंबई महापालिकेच्या के.ई.एम्., सायन, नायर, कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयातील ५०० डॉक्टरांना निवडणुकीच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहे.

Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

मागील लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !

मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८५.९३ टक्के उमेदवारांना त्यांची ठेवही राखता आली नाही.

Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

महाराष्ट्रात १९, २६ एप्रिल, ७, १३ आणि २० मे या दिवशी लोकसभेच्या मतदानासाठी भरपगारी सुटी !

ही सुटी शासकीय आस्थापनांसह सर्व खासगी आस्थापनांनाही असणार आहे. अपवादात्मक स्थितीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवसाची सुटी शक्य नसल्यास मतदान करण्यासाठी त्यांना किमान २ घंट्यांची सवलत दिली जाणार आहे.

Shivaraj Tangadagi Controversial Statement : पंतप्रधान मोदी यांचा जयघोष करणार्‍या विद्यार्थ्यांना थप्पड मारा ! – कर्नाटकातील मंत्री शिवराज तंगदागी

अहिंसावादी आणि गांधीवादी काँग्रेसची हिंसाचारी मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशी काँग्रेस हिंदूंना आतंकवादी ठरवते !

Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

संपादकीय : निवडणुकीतून नेमकी कशाची संधी ?

मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !