Malegaon ‘Vote Jihad’ Kirit Somiya : मालेगाव येथे ‘व्‍होट जिहाद’साठी बँक खात्‍यात ८०० कोटी रुपये हस्‍तांतरित ! – किरीट सोमय्‍या, भाजप

७ मुसलमानांसह दुबईतील आस्‍थापनांचा सहभाग


मालेगाव – भाजपचे नेते किरीट सोमय्‍या यांनी निवडणुकीच्‍या काळात ‘व्‍होट जिहाद’ करण्‍यासाठी काहींच्‍या बँक खात्‍यात ८०० कोटी रुपये हस्‍तांतरित केले जात असल्‍याची माहिती दिली आहे. मालेगाव येथील या प्रकाराची माहिती ‘एक्‍स’ खात्‍याद्वारे दिली. यात २१ बँक खात्‍यांचा समावेश आहे. या प्रकरणात सिराज महंमद, अक्रम महंमद, मामू, मोईन खान इस्‍माईल खान, सलमान शकील मिर्झा, नफिसा बाई, महंमद साजिद, तसेच दुबई येथील ५ व्‍यावसायिक आस्‍थापनांचा सहभाग असल्‍याचे सोमय्‍या यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?


मालेगावमध्‍ये २५० कोटी रुपरांचा बेहिशोबी आर्थिक व्‍यवहार झाला असून त्‍यांतील १२० कोटी रुपये निवडणुकीमध्‍ये ‘व्‍होट जिहाद’साठी वापरण्‍यात आले आहेत, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्‍या यांनी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर नोव्‍हेंबरमध्‍ये केला होता. या वेळी त्‍यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणीही केली होती. काही मुसलमानांनी सहकारी बँकेच्‍या शाखेत अनुमाने २४ बँक खाती उघडली. त्‍यांत जमा झालेले पैसे वेगवेगळ्‍या ठिकाणच्‍या ३७ बँक खात्‍यांमध्‍ये पाठवण्‍यात आले. तेथून हा पैसा काढण्‍यात आला. या २५० कोटी रुपयांच्‍या आर्थिक व्‍यवहारातील १२० कोटी रुपये ‘व्‍होट जिहाद’साठी वापरण्‍यात आले, असा आरोप सोमय्‍या यांनी त्‍या वेळ केला होता.

संपादकीय भूमिका

या प्रकरणातील संबंधितांना कठोर शिक्षाही व्‍हायला हवी !