मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण !

मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या वर्ष २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराचे ९ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे वितरण करण्यात आले.

मणीपूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मे या दिवशी हिंसाचारात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

रस्‍त्‍यांची गुणवत्ता पडताळण्‍यासाठी महामंडळाची स्‍थापना !

३ मे या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या  मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला.

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर !

आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने  राज्‍यशासनाकडे सादर केला आहे.

अवैध वाळूउपसा केल्‍यास थेट ‘मकोका’ लागणार ! – महसूलमंत्री विखे पाटील

वाळूच्‍या अवैध वाहतुकीस आणि तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.

‘हर घर सावरकर’ राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथे पार पडली !

‘हर घर सावरकर’ हे घोषवाक्‍य घेत राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली.

एस्.टी.चे रूप पालटण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एस्.टी. ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एस्.टी.ने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी. एस्.टी.चे रूप पालटण्याचा राज्यशासनाने संकल्प सोडला आहे.

मुंबईमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमात अमित शहा यांची उपस्थिती, ५ सहस्रांहून अधिक ठिकाणी प्रक्षेपण !

विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले  होते.

वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ तालुका असे करावे !

अशी मागणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना मुंबई मेट्रोत २५ टक्के सवलत !

१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे.