मुंबई – वसई (जिल्हा पालघर) येथील तुंगारेश्वर डोंगर येथील बालयोगी पू. सदानंद महाराज यांच्या कार्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. २७ एप्रिल या दिवशी एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र तुंगारेश्वर येथील आश्रमात जाऊन बालयोगी पू. सदानंद महाराज यांचे दर्शन घेतले.
गेल्या ५२ वर्षांपासून याठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे साहेब यांच्यासोबत काही वेळा या आश्रमाला भेट दिलेली होती. ज्याप्रमाणे दिघे साहेब बालयोगी सदानंद बाबांचे भक्त होते, त्याचप्रमाणे मी देखील श्री नित्यानंद बाबांचा भक्त आहे. दिशाहीन आयुष्य… pic.twitter.com/S0f8gHzHTf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात बालयोगी पू. सदानंद महाराज यांच्या संस्थेने या परिसरातील लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. पू. सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणार्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाण्याची परंपरा त्यांनी जोपासली. भविष्यातही आश्रमाकडून मानवी उन्नतीसाठी आध्यात्मिक कार्य व्हावे.’’