हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील अवैध मदरशाच्या विरोधात लढा देणारे नितीन काकडे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार !

वढू-बुद्रुक (जिल्हा पुणे) – हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र समन्यय समितीचे श्री. नितीन काकडे यांनी हुपरी अवैध मदरशाच्या बांधकामाच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभा केला. निवेदन, आंदोलन, उपोषण, न्यायालयीन लढाई या माध्यमातून गेली ७ वर्षे हा लढा देऊन अवैध मदरसा प्रशासनास पाडण्यास भाग पाडल्याविषयी त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २९ मार्चला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘धर्मवीर संभाजी महाराज’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे महंत पू. रामगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थित होती, तर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी श्री. नितीन काकडे यांनी केलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले.