पोलीस अन्वेषणाला प्रारंभ
पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इस्रायली नागरिक आणि अमली पदार्थ व्यावसायिक अटाला उपाख्य यानीव बीनेम याच्याकडे पोलिसांना अन्वेषण करतांना आधारकार्ड सापडले आहे. गोवा पोलीस अटाला याला आधारकार्ड कुणी दिले याचा शोध घेत आहेत. (अशा प्रकारे आधारकार्ड देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
गोवा पोलिसांनी अटाला याला ५ एप्रिल या दिवशी शिवोली येथे अमली पदार्थ व्यवसायावरून कह्यात घेतले होते आणि त्याच्याकडून ८ लाख ७० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ आणि ४० सहस्र रुपये रोख रक्कम कह्यात घेतली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलिसांना अटाला याच्याकडे आधारकार्ड सापडले आहे. यापूर्वी अटाला याचा अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि राजकारणी यांच्या साखळीत सहभाग असल्याचे समोर आल्याने याचा मोठा गाजावाजा झाला होता.