मालवण – शहर बाजारपेठेत गांजा ओढल्याच्या प्रकरणी चिराग हरीश गावकर (वय २१ वर्षे, रहाणार वायरी, मालवण) आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय २३ वर्षे, रहाणार चिवला बिच, मालवण) या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस कर्मचारी महादेव घागरे यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ एप्रिलला रात्री ही कारवाई केली.
(अमली पदार्थांपासून भावी पिढी वाचवायची असेल, तर केवळ पोलीस आणि प्रशासन यांच्यावर अवलंबून न रहाता प्रत्येकानेच आता सतर्क राहून अमली पदार्थांच्या विरोधात कृतीशील होणे आवश्यक आहे, त्याचबरोबर या पिढीला बालपणापासूनच साधना आणि नैतिकता शिकवणे आवश्यक आहे ! – संपादक)