PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या गुप्तचर संचालिक तुलसी गॅबर्ड यांची घेतली भेट

व्हाईट हाऊसमध्ये (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. विशेष म्हणजे या शपथविधीनंतर तुलसी गॅबर्ड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Trump Suspends Anti-Bribery Law : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परदेशातील भ्रष्टाचारविरोधी कायदा केला रहित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ५० वर्षे जुना ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट’ हा कायदा रहित केला आहे. यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणे आता गुन्हा ठरणार नाही. याच कायद्याच्या अंतर्गत अमेरिकेत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Israel-Gaza Ceasefire : १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व ओलिसांना सोडले नाही, तर युद्धबंदी करार रहित करू ! – डॉनल्ड ट्रम्प

जर १५ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडले नाही, तर मला वाटते की, युद्धबंदी करार रहित करावा, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमासला दिली.

कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याविषयी मी गंभीर !

कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याच्या संदर्भात मी गंभीर आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले. ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की ५१ वे राज्य म्हणून कॅनडाची स्थिती पुष्कळ चांगली असेल.

US Will Take Over Gaza : गाझापट्टी विकत घेऊन ‘हमास तेथे पुन्हा परतणार नाही’, असा प्रयत्न करू ! – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टी विकत घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. वायूदलाच्या कार्याक्रमात ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, गाझापट्टी विकत घेण्याचा आमचा विचार असून हमास तिथे पुन्हा कधीच परतणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Mahakumbh Dharm Sansad : राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा धर्मसंसदेत प्रस्ताव पारित

मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

France AI Action Summit : फ्रान्समधील जागतिक ‘एआय’ परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाणार !

पॅरिस येथे १० फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शिखर परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्तेचे भू-राजकीय परिणामांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवत आहेत.

संपादकीय : ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध !

देशाच्या प्रगतीसाठी उदारमतवाद त्यागून वास्तववादी धोरणे स्वीकारण्याचा गुण भारतियांनी शिकावा !

Border Detention Centers : अमेरिकेत प्रतिदिन पकडल्या जाणार्‍या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे ‘डिटेन्शन सेंटर्स’ भरली !

भारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. भारतापेक्षा जवळपास तिप्पट भूमी असलेली अमेरिका जर १ कोटी लोकांची हकालपट्टी करू शकते, तर भारत असे का करू शकत नाही ?

USAID Controversial Funding : अमेरिकेच्या शाखेने तालिबान्यांना गर्भनिरोधकापासून ते नेपाळला नास्तिक बनवण्यासाठी वाटले पैसे !

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रोखले सर्व साहाय्य