नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

डोनाल्ड ट्रम्प अणूबॉम्बद्वारे आक्रमणाचा आदेश देऊ शकतात ! – विरोधी पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना संशय

ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्‍चर्य वाटायला नको !

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद  

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी  संसदेमध्ये घुसून केलेल्या हिंसचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील संसदेमधील हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू

जगातील बलाढ्य महासत्ता असणार्‍या अमेरिकेत असे घडते, हे लज्जास्पद ! इतर वेळी लोकशाही, मानवाधिकार आदी सूत्रांवरून भारताला सुनवणार्‍या अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजवणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !

रडीचा हिंसक डाव !

लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो.

मृत्यूदंडाच्या कार्यवाहीची आवश्यकता !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षेची कार्यवाही केल्याच्या चांगल्या परिणामांचे अन्य कोणते चांगले उदाहरण असू शकेल ? लोकशाहीवादी अमेरिकेने चांगला पायंडा पाडला आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेकडून बोध घेऊन मृत्यूदंड अथवा फाशीच्या शिक्षांची तात्काळ कार्यवाही करून जनतेचे सर्वंकष हित साध्य करावे !

अमेरिकेत गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून बाळ काढणार्‍या महिलेला फाशी होणार

अमेरिकेत वर्ष २००४ मध्ये लिसा मॉन्टेगोमेरी या महिलेने एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे पोट चिरून बाळ पळवले होते.

इराकमधील एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर इराणवर सैन्य कारवाई करू !

भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !

बंदी ते बक्षिसी !

आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्‍या काळात भारत विश्‍वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला.