PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या गुप्तचर संचालिक तुलसी गॅबर्ड यांची घेतली भेट

दोघांमध्ये झाली अमेरिकेतील पहिली महत्त्वाची बैठक

वॉशिंग्टन (अमेरिका) – तुलसी गॅबर्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका म्हणून शपथ घेतली. व्हाईट हाऊसमध्ये (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. विशेष म्हणजे या शपथविधीनंतर तुलसी गॅबर्ड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गॅबर्ड यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर झालेल्या दोघांमधील बैठकीत भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी या भेटीनंतर इन्स्टाग्रामवर लिहिले की, वॉशिंग्टनमध्ये तुलसी गॅबर्ड यांची भेट घेतली आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. त्या नेहमीच भारत-अमेरिका मैत्रीची खंबीर समर्थक राहिल्या आहेत.