US Will Take Over Gaza : गाझापट्टी विकत घेऊन ‘हमास तेथे पुन्हा परतणार नाही’, असा प्रयत्न करू ! – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टी विकत घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. वायूदलाच्या कार्याक्रमात ते बोलत होते.

ट्रम्प म्हणाले की,

गाझापट्टी विकत घेण्याचा आमचा विचार असून हमास तिथे पुन्हा कधीच परतणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. गाझापट्टी हा एक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला पट्टा आहे. आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही तो हळू हळू विकसित करू. मध्य-पूर्वेच्या या प्रदेशात आम्हाला स्थैर्य आणायचे आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची भेट झाली होती. त्या वेळी ‘ट्रम्प यांच्याकडे गाझापट्टीसाठी एक वेगळे धोरण आहे’, असे नेत्यानाहू म्हणाले होते.