राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रोखले सर्व साहाय्य

वॉशिंग्टन (अमेरिका) – डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणले जात आहे. ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ (यू.एस्.ए.आय.डी.) या शाखेने अमेरिकी करदात्यांच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. या विभागाने अफगाणिस्तानात गर्भनिरोधकाचे वाटप केले आहे आणि नेपाळला नास्तिक बनवण्यासाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केल्याचे उघड झाले आहे. ‘यू.एस्.ए.आय.डी.’ ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची साहाय्य शाखा आहे. या शाखेद्वारे अमेरिका जगातील गरीब देशांमध्ये आरोग्य आणि आपत्कालीन साहाय्य करते.
An American branch called USAID is believed to be responsible for the birth of the Taliban and for making Nepal an atheistic state by distributing money for these causes !
President Trump however has withheld all further aid
However it is important to note what was America’s… pic.twitter.com/uK92Ly36tN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2025
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या विभागावर टीका करतांना म्हटले की, ‘यू.एस्.ए.आय.डी.’ कट्टरतावादी साम्यवाद्यांना वेड्यात काढत आहे. ज्या पद्धतीने पैसे खर्च केले जातात, त्यातील बराचसा भाग समजण्यासारखा नाही. भ्रष्टाचाराची पातळी यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. ते थांबवा !
साहाय्याच्या नावाखाली या शाखेने काय केले ?
१. अफगाणिस्तानमध्ये तालिबानला दीड कोटी डॉलर्स (१३१ कोटी ७३२ लाख रुपयांचे) किमतीचे गर्भनिरोधक वाटले.
२. नेपाळमध्ये नास्तिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी साडेचार लाख डॉलर्सची (सुमारे ४ कोटी रुपयांची) तरतूद केली.
३. कोलंबियामध्ये एका तृतीयपंथींसाठी सभागृह बनवण्यासाठी ४७ सहस्र डॉलर्स (४१ लाख २७ सहस्र रुपये) खर्च केले.
४. अर्जेंटिनामधील समलिंगी पत्रकारांसाठी हवामान पालटावर चर्चा करण्यासाठी ५५ सहस्र डॉलर्स (४८ लाख २९ सहस्र रुपये) दिले.
संपादकीय भूमिकानेपाळ पूर्वी हिंदु राष्ट्र होते आणि तेथे बहुसंख्य धार्मिक हिंदु असतांना त्यांना नास्तिक करण्यामागे अमेरिकेचा काय हेतू होता, हे वेगळे सांगायला नको. अशा बाहेरील हस्तक्षेपामुळेच नेपाळ आज ‘धर्मनिरपेक्ष देश’ होऊन भारतापासून दूर गेला आहे. हे नेपाळी हिंदूंच्या लक्षात येईल, तो सुदिन ! |