Trump Suspends Anti-Bribery Law : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परदेशातील भ्रष्टाचारविरोधी कायदा केला रहित

उद्योगपती अदानी यांच्या विरोधात याच कायद्यांर्तगत अमेरिकेत नोंदवण्यात आला आहे गुन्हा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ५० वर्षे जुना ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट’ हा कायदा रहित केला आहे. यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणे आता गुन्हा ठरणार नाही. याच कायद्याच्या अंतर्गत अमेरिकेत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात भारतीय अधिकार्‍यांना लाच देण्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याच्या २ दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.

१. ट्रम्प यांनी आदेश दिला आहे की, इतर देशांमध्ये व्यवसाय मिळवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी परदेशी अधिकार्‍यांना लाच दिल्याचा आरोप असलेल्या अमेरिकी लोकांवर न्याय विभागाने खटले चालवणे थांबवावे.

२. गेल्या वर्षी अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह ८ जणांवर अनुमानेे २ सहस्र २९ कोटी रुपये लाच देण्याची योजना आखण्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांनी अमेरिकी गुंतवणूकदार आणि बँका यांना खोटे बोलून पैसे गोळा केल्याचाही आरोप होता.