राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील ‘झोटिंग समिती’चा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गहाळ !
माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी (पुणे) येथील औद्योगिक वसाहतीमधील भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने न्यायमूर्ती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘झोटिंग समिती’ नियुक्त केली होती.