नागपूर येथे केवळ २ मासांत रस्त्यांवर २ सहस्रांहून अधिक खड्डे !

रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही.

सरकारने पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पालट करून पायी वारी होण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या १६ जून या दिवशी सोलापूर येथे भजन आंदोलन करणार आहोत….

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात घुसखोरी केली ! – बबनराव लोणीकर, आमदार

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात ते घुसखोरी करत आहेत, असा आरोप..

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे समजावून सांगणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने १५ मास झोपा काढल्या आहेत. राज्यात कोविड आजारामध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ दिलेल्या, तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देणे आवश्यक आहे….

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट !

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

आयोग सिद्ध केला असता, तर अन्य मागासवर्गियांचे आरक्षण पुनर्स्थापित करता आले असते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते. मोर्चे काढण्याऐवजी या खटल्यात लक्ष घातले असते, तर आरक्षण टिकवता आले असते.

पदोन्नतीतील आरक्षणावर तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची पदोन्नती आरक्षणाच्या सूत्रावरून वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे.

नागपूर येथे बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’द्वारे साहाय्य करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिसच्या) स्थितीचा आढावाही घेतला.

शासनाने पीडितांना तातडीने भरघोस हानीभरपाई द्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने काही घोषणा केल्या होत्या; मात्र त्याची हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. शासनाने पीडितांना तातडीने हानीभरपाई द्यायला हवी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …..

आधुनिक वैद्यांअभावी अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बंद; चालू करण्यासाठी प्रयत्न चालू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालया’ला भेट देऊन पहाणी केली.