अमरावती येथे ‘अंडरपास’मध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपक्ष आमदार रवि राणा यांनी शहर अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून बळजोरीने चालायला लावले !

रस्त्याची अशी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या लाखो रुपयांची हानी करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

२० सहस्र माथाडी कामगारांचे लसीकरण करणार ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.

गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे महाविकास आघाडी सत्तेला चिकटली आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात.

सामाजिक अंतराचा नियम पाळून मंदिरे उघडण्यास काय हरकत ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्‍यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे.

पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार ! – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते होणार आहे, असे मत व्यक्त केले.

पूरग्रस्तांसाठी सरकारकडून केवळ १ सहस्र ५०० कोटी रुपयांचेच तातडीचे साहाय्य ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

पूरस्थितीनंतर पुनर्बांधणीसाठी ३ सहस्र कोटी रुपये आणि सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ सहस्र कोटी असे १० सहस्र कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात.

वारंवार येणार्‍या संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्याची मागणी

कोकणात वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेली दोन वर्षे आमच्याकडे कुणीच पाहिले नाही ! – चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थ

हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही.’’ 

सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.