पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

श्रद्धा वालकर हिने पोलिसांत केलेली तक्रार मी पाहिली आहे. ही तक्रार अतिशय गंभीर आहे. त्या तक्रारीवर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, याउलट सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी यांसह तिकडे असलेली गावे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील कुंभ महोत्सव !

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !  

हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

शेतकर्‍यांना दिवसा १२ घंटे वीज देण्याचा प्रयत्न ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्‍या काळात शेतकर्‍यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी विजेचे सर्व ‘फीडर’ (फीडर म्हणजे विजेचा मुख्य पुरवठा केला जाणारी वाहिनी) सौर उर्जेवर आणणार आहे.

शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.

अभिनेत्री जुही चावला यांच्या मुंबईतील दुर्गंधीविषयीच्या ट्वीटला उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जुही चावला यांनी २ दिवसांपूर्वी ‘हवेत पुष्कळ दुर्गंधी पसरलेली आहे. आधी ती वांद्रे आणि वरळीजवळील भागातील खाडीच्या ठिकाणाहून जाताना जाणवायची. आता ती संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे.