अभिनेत्री जुही चावला यांच्या मुंबईतील दुर्गंधीविषयीच्या ट्वीटला उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर !

कलाकारांनी शहराविषयी विधाने करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा !

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जुही चावला यांनी २ दिवसांपूर्वी ‘हवेत पुष्कळ दुर्गंधी पसरलेली आहे. आधी ती वांद्रे आणि वरळीजवळील भागातील खाडीच्या ठिकाणाहून जाताना जाणवायची. आता ती संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. दुर्गंधी आणि हवेतील प्रदूषण यांमुळे दिवसेंदिवस आम्हाला गटारात रहात असल्यासारखे वाटत आहे’, अशा आशयाचे ट्वीट केले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘“मुंबई हे एक महान शहर आहे. या शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे, हे खरे आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे; पण आता सरकार पालटले आहे. लवकरच मुंबईही पालटणार आहे. त्यामुळे मुंबईविषयी अशाप्रकारे बोलणे चुकीचे आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे कलाकारांनी अशी विधाने करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा.’’