एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार आणि खासदार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देणार !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता सलमान खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या काळातच ‘फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना स्वत: तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.

प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाची पुन्हा लक्षवेध आंदोलनाची चेतावणी !

महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती !

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतांना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तसेच या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणूक केली होती.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मनसेचा कुणालाही पाठिंबा नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पाठिंब्यासाठी भाजपकडून आलेल्या विनंतीला धुडकावून लावत ‘भाजपनेच या निवडणुकीतून माघार घ्यावी’,

महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देणार !

जे आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. या निर्णयामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत, हे हिंदूंना समजले. 

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ?

कार्यालयातील अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कारवाई आवश्यकच ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आरोग्य विभागात ‘अकाऊंटिबिलिटी’ची (दायित्वाची) आवश्यकता आहे.

आम्हाला परत फाळणीच्या रस्त्याने जायचे नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आम्हाला एकत्र रहायचे असेल, तर आधी भारताचे व्हावे लागेल. आम्ही भारतीय पूर्वज आणि भारतीय संस्कृती यांचे वंशज आहोत. समाज आणि राष्ट्रीयता यांच्या संबंधाने आम्ही एक आहोत. हाच आमच्यासाठी तारक मंत्र आहे.