दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास नकार देत या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !

या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये. – ‘हिजाब’ वादावर सद्गुरु जग्गी वासुदेव

कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली भेट !

स्वामीजींना हिंदी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.

उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने मागे घेतले होते !

भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.

देशातील बहुतांश विधानसभांच्या कामकाजाचा कालावधी वर्षाकाठी ३० दिवसांहून अल्प !

लोकसभेचे कामकाज वर्षाकाठी सरासरी ६३ दिवस, तर अमेरिका, इंग्लंड आणि जपान येथील संसदांचे कामकाज भारताच्या तुलनेत अडीच पटींहून अधिक दिवस चालते !

उच्च न्यायालयांनी इतर मते मांडण्याऐवजी केवळ खटल्यापुरतेच बोलावे !

देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेविषयी निरीक्षणे नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. ती निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने हटवत उच्च न्यायालयांना वरील सल्ला दिला.

देहली येथे धर्मांध मामाकडून ७ वर्षांच्या भाचीवर बलात्कार !

‘हिजाब न घातल्यामुळे भारतात सर्वाधिक बलात्कार होतात’, असे म्हणणारे काँग्रेसचे नेते जमीर अहमद अशा घटनांविषयी काय बोलणार आहेत ?

देहलीत ८७ वर्षांच्या महिलेवर बलात्कार !

देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

इस्लाममध्ये कुठेही महिलांसाठी हिजाबचा उल्लेख नाही ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत.