नवी देहली – देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने सर्व खासगी शाळांतील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत. यांमध्ये इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन्ही शैक्षणिक वर्षांसाठी हा आदेश असून देहली सरकारच्या अल्पसंख्यांकांसंबंधी योजनेच्या अंतर्गत हे शुल्क देहली सरकार स्वत: भरणार आहे. (थोडक्यात बहुसंख्य हिंदूंनी भरलेल्या करातून हे शुल्क भरले जाणार आहे. हिंदूंनो, आप सरकारच्या या निर्णयाला वैध मार्गाने विरोध करा ! – संपादक)
Kejriwal’s Minority Appeasement: Delhi Govt asks private schools to refund tuition fees of students from minority communitieshttps://t.co/jexqC8CPcc
— OpIndia.com (@OpIndia_com) May 17, 2022
या योजनेच्या अंतर्गत ज्या अल्पसंख्यांक समुदायातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांहून अल्प आहे, अशा कुटुंबियांतील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तब्बल ४८ सहस्र रुपयांपर्यंतचे वार्षिक शुल्क परत केले जाऊ शकते.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे अल्पसंख्यांकधार्जिणे आप सरकार ! |