‘वाघ बकरी चाय’ आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांचे निधन 

‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले.

देवरुख येथील आध्यात्मिक गुरु  श्री. अजित तेलंग (वय ७१ वर्षे) स्वामीचरणी विलीन

भारत शासनाच्या ‘आयुषमान भारत’ या प्रकल्पांअंतर्गत श्री. अजित तेलंग यांनी गुजरात येथे रेकि विद्यानिकेतनद्वारे १ सहस्र ६०० हून अधिक वैद्यकीय अधिकार्‍यांना रेकिचे प्रशिक्षण दिले.

बेंगळुरूत फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू  

दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले.

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

कडेगाव (सांगली) येथील प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांचे निधन !

कडेगाव-पलूस, जिल्‍हा सांगली येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय ४४ वर्षे) यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले. सनातन संस्‍थेच्‍या मलकापूर येथील साधिका सौ. कांतावती देशमुख यांचे ते ज्‍येष्‍ठ चिरंजीव होते.

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

ज्‍येष्‍ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

सीमा देव यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते अजिंक्‍य देव यांनी वर्ष २०२० मध्‍ये सीमा देव या ‘अल्‍झायमर्स’ या आजाराने ग्रस्‍त होत्‍या. सीमा देव आणि त्‍यांचे दिवंगत यजमान अभिनेते रमेश देव यांनी ‘आनंद’ या चित्रपटात केलेली भूमिका विशेष गाजली.

मथुरा येथे माकडांच्या झुंजीमुळे घराचा भाग कोसळून ५ जण मृत्यूमुखी  

अपघातानंतर वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन !

‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’ हे त्‍यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह ‘गपसप’, ‘गावातल्‍या गोष्‍टी’ हे कथासंग्रहही वाचकांना आवडले.