सांगली – ‘हिंदू एकता आंदोलना’चे संस्थापक अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ नारायणराव कदम (वय ८६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने ४ जुलैला निधन झाले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेली विविध आंदोलने, मोर्चे यांत त्यांचा नेहमी पुढाकार असे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासाठी त्यांचा पाठिंबा असे. हिंदुत्वावरील आघातांसाठी ते पुढाकार घेऊन कृती करत.
या संदर्भात माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘वर्ष १९८० पासून हिंदूंना एकत्र करणे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडणे यांसाठी नारायणराव कार्यरत होते. त्याकाळी समान नागरी कायदा झाला पाहिजे, अयोध्येत राममंदिर झाले पाहिजे, काश्मीरमधून ३७० कलम हटले पाहिजे, यासाठी त्यांनी लढा दिला आहे. मिरजेत झालेल्या ‘अरब हटाव’ मोहिमेत त्यांचा पुढाकार होता. नारायणराव यांच्या जाण्याने हिंदुत्वाची मोठी हानी झाली आहे.’’