‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर (वय ८४ वर्षे) यांचे २१ मार्च या दिवशी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ६ जण ठार !

अपघात १२ मार्च या दिवशी सकाळी झाला. चारचाकी वाहन हे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ‘डिव्हायडर’मध्ये घुसून ३-४ पलट्या मारून दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर उलटले.

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या आजाराने पुणे येथे निधन !

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुणे येथे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर केलेल्या आक्रमणात ५ जण ठार

दीड मासापूर्वी इस्रायलने दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते. त्यात २ सैनिकांसह ४ नागरिक ठार झाले होते.

संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !

नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.

तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.

गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली निवर्तले !

नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे.