महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज

नवी मुंबई – महातपस्वी योगी प.पू. गगनगिरी महाराजांचे शिष्य आणि तळोजा (पनवेल) येथील परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज (जुना आखाडा) यांनी ३ मार्चला सायंकाळी ७ वाजता देहत्याग केला. ५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

महाराजांनी तळोजा (पनवेल) येथे त्यांनी परम शांतीधाम वृद्धाश्रमाची स्थापना केली. तेथे निराधार वृद्धांची मृत्यूपर्यंत विनामूल्य सेवा केली जाते. आतापर्यंत १ सहस्र १५० वृद्धांना आधार देण्यात आला आहे.

आबानंदगिरी महाराजांची सनातनच्या देवद येथील आश्रमाला भेट

सनातन संस्था आणि महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज

वर्ष २००० मधील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या झालेल्या वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थिती (डावीकडून तिसरे)

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांची सनातन संस्थेशी विशेष जवळीक होती. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ते नेहमी विचारपूस करायचे. वर्ष २००० मधील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या झालेल्या वर्धापनदिन सोहळ्यालाही ते उपस्थित होते.