दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्त भक्तांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !
भेट द्या : https://www.sanatan.org/Chaitanyavani
भेट द्या : https://www.sanatan.org/Chaitanyavani
कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.
साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे पुढे दिली आहेत
दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश होतो.
कमंडलूतील पाणी संत तीर्थ म्हणून देतात. वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठीही यातील तीर्थाचा वापर होतो. दत्ताच्या हातातील कमंडलूमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची शक्ती आकृष्ट झाली आहे.
श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते. पुण्याजवळील नारायणपूर येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे देत आहोत.
दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.
‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.
‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’
दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.