साक्षात् श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी जागृत तीर्थक्षेत्रे

माहूर : ता. किनवट, जि. नांदेड

गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र.

कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. ब्रह्मानंद सरस्वती यांनी येथे प्रथम दत्तमंदिर उभारले.

नरसोबाची वाडी, जिल्हा कोेल्हापूर, महाराष्ट्र : दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचे येथे बारा वर्षे वास्तव्य होते. येथे अष्टतीर्थे अन् दत्त परंपरेतील सात संतांच्या समाध्या आहेत. हे टेंबेस्वामींचे प्रेरणास्थान !

औदुंबर : श्री नृसिंह सरस्वतींनी येथे निवास केला.

गाणगापूर : पुणे-रायचूर मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींनी २३ वर्षे वास्तव्य केले. येथूनच त्यांनी श्रीशैल्यास प्रयाण केले.

कुरवपूर (कर्नाटक) : रायचूरहून मोटारीने पल्लदिनीपर्यंत (कुरगुड्डी) जाता येते. कृष्णेच्या पाण्यात हे बेट आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्यस्थान !

पीठापूर (आंध्रप्रदेश) : श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान.

वाराणसी : येथे नारदघाटावर दत्तात्रेय मठ आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे वंशज आजही तेथे आहेत.

श्रीशैल्य : श्री नृसिंह सरस्वतींनी तेथे गमन केले.

भट्टगाव : हे काठमांडूपासून (नेपाळ) ३५ कि.मी. अंतरावर आहे.

पांचाळेश्वर : जिल्हा बीड