श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्रीदत्त – ‘उत्पत्ति, स्थिती आणि लय

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते. पुण्याजवळील नारायणपूर येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

जेव्हा श्री दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे सगुण स्तरावर कार्यरत असतात, या तिन्ही रूपांमध्ये द्वैतभाव असतो आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कार्यरत असते, तेव्हा श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते.

नारायणपूर येथील श्री दत्ताची एकमुखी मूर्ती

जेव्हा दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे सगुण स्तरावर कार्यरत असतात, या तिन्ही रूपांमध्ये अद्वैतभाव कायम राहून ती एकमेकांशी एकरूप झालेले असतात, तेव्हा त्यांची तीन भिन्न मुखे न दाखवता एकच मुख मूर्तीमध्ये दाखवलेले असते. त्यामुळे ती मूर्ती एकमुखी असते.’

– कु. मधुरा भिकाजी भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१८)