दत्ताच्या हातात असणार्‍या कमंडलूची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

१. इतर भांड्यांपेक्षा कमंडलू अधिक सात्त्विक आहे. तो सात्त्विक धातूपासून बनवण्यात येत असून त्याचा आकारही सात्त्विक आहे.

२. कमंडलूतील पाणी संत तीर्थ म्हणून देतात. वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठीही यातील तीर्थाचा वापर होतो. दत्ताच्या हातातील कमंडलूमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची शक्ती आकृष्ट झाली आहे.

पू. (सौ.) योया वाले

३. कमंडलूमध्ये तीर्थ असल्यामुळे देवतातत्त्वाचे चक्राकार वलय कमंडलूमध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते.

४. पूर्वजांचे त्रास दूर करण्यासाठी कमंडलूतून मारक शक्तीचे कण प्रक्षेपित होत आहेत.

– (पू.) सौ. योया सिरीयाक वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१३.९.२०११)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.