धर्माचरण करण्‍याची आवड असलेली ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची सरंद, (तालुका संगमेश्‍वर, जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. दिव्‍या दयानंद जड्यार (वय १४ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. दिव्‍या दयानंद जड्यार ही या पिढीतील एक आहे !

माघ शुक्‍ल षष्‍ठी (३.२.२०२५) या दिवशी कु. दिव्‍या दयानंद जड्यार हिचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आईच्‍या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. दिव्‍या जड्यार

कु. दिव्‍या दयानंद जड्यार हिला १४ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

 ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘कु. दिव्‍यामध्‍ये पुष्‍कळ चिकाटी आहे. 

२. तिला अभ्‍यास आणि पाठांतर करण्‍याची आवड आहे. तिने एका स्‍पर्धेसाठी १०० सुभाषिते मुखोद़्‍गत केली होती.

३. ती मला घरकामात आणि सेवेत साहाय्‍य करते.

सौ. प्रीती दयानंद जड्यार

४. साधनेची ओढ : ती प्रतिदिन नामजप करते. ती घरी देवांची पूजा करते. ती भक्‍तीसत्‍संग नियमित ऐकते. ती दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करते.

५. धर्माचरण करणे : ती नेहमी सात्त्विक कपडे घालते आणि कपाळावर कुंकू लावते. ती मला ‘आई’ आणि तिच्‍या वडिलांना ‘बाबा’ म्‍हणते. ती ‘वाढदिवस तिथीप्रमाणेच साजरा करायचा’, असे सांगते.

६. धर्माभिमान : एखाद्या ठिकाणी देवतांचे विडंबन होत असल्‍यास त्‍याविषयी तिच्‍या लगेच लक्षात येते.

७. चुकांविषयी संवेदनशील : ती तिच्‍याकडून झालेल्‍या चुका वहीत लिहिते. ती इतरांना त्‍यांच्‍याकडून होणार्‍या चुकांविषयी सांगते.

८. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव : ती ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ वाचते. ती त्‍या ग्रंथांतील छायाचित्रे पहाते. ती परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या छायाचित्राला फुले वहाते.’

– सौ. प्रीती दयानंद जड्यार (कु. दिव्‍याची आई), संगमेश्‍वर, जिल्‍हा रत्नागिरी. (२०.६.२०२४)

कु. दिव्‍या हिला आलेल्‍या अनुभूती

१. ‘मी शाळेतील स्‍पर्धांत सहभागी होते. तेव्‍हा मी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) मला साहाय्‍य करतात’, असा भाव ठेवते. त्‍यामुळे  मला सुभाषित पठण स्‍पर्धा आणि मनाचे श्‍लोक पठण स्‍पर्धा या स्‍पर्धांमध्‍ये पारितोषिके मिळतात.

२. मी देवतांची चित्रे काढत असतांना ‘गुरुदेव माझ्‍याकडून चित्रे काढून घेतात’, असे मला जाणवते.’

‘गुरुदेवांनी मला या अनुभूती दिल्‍या आणि माझ्‍यावर कृपेचा वर्षाव केला आहे’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. दिव्‍या दयानंद जड्यार (१५.१.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.