सहनशील आणि नियमित साधना करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा गदग, कर्नाटक येथील कु. यशगौडा कलकनगौडा मल्लगौडर (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. यशगौडा मल्लगौडर हा या पिढीतील एक आहे !

गदग, कर्नाटक येथील कु. यशगौडा कलकनगौडा मल्लगौडर (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) याचा १३.२.२०२५ (माघ कृष्ण प्रतिपदा) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. यशगौडा मल्लगौडर याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

कु. यशगौडा मल्लगौडर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. स्वभाववैशिष्ट्ये

अ. ‘कु. यशगौडा घरातील केर काढणे, स्वतःचे कपडे धुणे इत्यादी कामे करतो.

आ. तो शाळेची पुस्तके, बॅग आणि इतर वस्तू व्यवस्थित ठेवतो.

इ. तो सहनशील आणि शांत आहे. एकदा त्याच्या पायावर दगड पडल्याने त्याचे शस्त्रकर्म करावे लागले. त्याचा पाय दुखत असतांनाही त्याने ते सहन केले. ‘गुरुदेव माझ्यासमवेत आहेत’, असे तो सांगत होता. आधुनिक वैद्यांनीही त्याच्या शांत स्वभावाचे कौतुक केले.

२. धर्माचरण आणि साधनेचे प्रयत्न

अ. तो प्रतिदिन शाळेत जातांना टिळा लावून आणि शक्यतो सात्त्विक पोशाख घालतो.

आ. त्याच्याकडून चूक झाल्यास तो श्रीकृष्णाची क्षमा मागून चुकीसाठी प्रायश्चित्त घेतो.

इ. तो गुरुस्मरण करणे, प्रतिदिन नामजप लिहिणे, प्रार्थना करणे, कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी कृती करतो.

ई. शिवरात्र किंवा अन्य वेळी तो ग्रंथप्रदर्शनात सहभागी होणे, घरी वस्तू व्यवस्थित लावून ठेवणे इत्यादी सेवा करतो.

३. भाव

अ. तो शाळेत किंवा कोणत्याही वैयक्तिक अडचणी आल्यास गुरुचरणी आत्मनिवेदन करतो. त्याची अडचण सुटल्यावर तो ‘गुरुदेवांनी मला साहाय्य केले’, असे कृतज्ञताभावाने सांगतो.

आ. घरी सेवा करतांना तो ‘मी आश्रमसेवा करत आहे’, असा भाव ठेवतो.’

– सौ. कविता मल्लगौडर (यशगौडाची आई), गदग, कर्नाटक. (२२.५.२०२४)