उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीकृष्ण लक्ष्मण कदम हा या पिढीतील एक आहे !
उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. श्रीकृष्ण लक्ष्मण कदम याचा माघ शुक्ल नवमी (६.२.२०२५) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रीकृष्ण कदम याला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. ‘कु. श्रीकृष्ण शांत आणि प्रेमळ आहे.
२. त्याला एखादी वस्तू हवी असल्यास तो आम्हाला विचारूनच ती वस्तू घेतो.
३. तो प्रत्येक कृती मनापासून करतो.
४. तो एखादी कृती करत असला, तरीही त्याचे सभोवती लक्ष असते.
५. तो टिळा लावून शाळेत जातो. तो नेहमीच मला टिळा लावायला सांगतो.

६. श्रीकृष्णला सात्त्विक जेवण आवडते.
७. साधनेची आवड
अ. तो प्रतिदिन पूजा करतो आणि देवाला नमस्कार करून सात्त्विक उदबत्ती लावतो.
आ. तो अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतो अन् अधूनमधून नामजप करतो.
इ. तो सत्संग शांतपणे ऐकतो.
ई. तो अभ्यास करण्यापूर्वी नामजप आणि प्रार्थना करतो.
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव
अ. तो मला नेहमी म्हणतो, ‘‘आपण डॉक्टरबाबांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) जाऊया.’’ तो माझ्या समवेत सेवा करण्यासाठी आल्यावर सगळ्यांना सांगतो, ‘‘माझे डॉक्टरबाबा रामनाथी आश्रमात आहेत. मी रामनाथीला जाणार आहे.’’
आ. परात्पर गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी आम्ही गोवा येथे गेलो होतो. तेव्हा तो सतत विचारत होता, ‘‘डॉक्टरबाबा केव्हा येणार ?’’ परात्पर गुरुदेवांचे मैदानात आगमन झाल्यावर श्रीकृष्णचा भाव जागृत झाला.
इ. आम्ही गोवा येथून घरी आल्यानंतर तो सगळ्यांना सांगत होता, ‘‘मी डॉक्टरबाबांना बघून आलो. डॉक्टरबाबा माझे आहेत.’’
– श्री. लक्ष्मण कदम (कु. श्रीकृष्णचे वडील), खानापूर, बेळगाव. (२.६.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.