पुणे येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. नंदन इंद्रजित वाडकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. नंदन इंद्रजित वाडकर हा या पिढीतील एक आहे !

चि. नंदन वाडकर

‘चि. नंदन इंद्रजित वाडकर याची त्याची आई, आजी आणि काका-काकू यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्म ते ३ मास

अ. ‘नंदन जन्मापासून शांत आहे.

आ. तो रात्री रडत असतांना आम्ही भ्रमणभाषवर श्रीकृष्णाचा पाळणा लावल्यानंतर तो शांत होत असे.

इ. आम्ही प्रतिदिन सकाळी भ्रमणभाषवर स्तोत्र लावल्यानंतर नंदन स्तोत्र ऐकतो.’

– सौ. शिवानी इंद्रजित वाडकर (चि. नंदनची आई), पुणे

१ ई. ‘नंदनला संत आणि चैतन्य यांची लहानपणापासूनच जाण (ओळख) आहे’, असे लक्षात येणे : ‘नंदन १२ दिवसांचा असतांना आम्ही त्याला पुणे येथील सेवाकेंद्रात घेऊन जाणार होतो. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही त्याला सांगितले, ‘‘नंदन, उद्या आपल्याला पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे) भेटतील. त्या तुला घेतील. तू त्यांना सांग, ‘‘मला आशीर्वाद द्या. मला गुरूंच्या चरणांजवळ जाण्यासाठी साधना करण्याची बुद्धी द्या.’’ तेव्हा तो एकदम ‘हो’ म्हणाल्यासारखे करून हसायला लागला. १२ दिवसांच्या बाळाचा हा सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले.’ – श्री. प्रदीप वाडकर (चि. नंदनचे काका) आणि सौ. प्रियांका प्रदीप वाडकर (चि. नंदनची काकू), फोंडा, गोवा.

२. वय ३ मास ते ६ मास 

अ. ‘नंदन कुणाकडेही लगेच जातो. त्याला ओळख लागत नाही.

आ. तो नेहमी हसतमुख असतो.

३. वय ६ मास ते ९ मास 

अ. नंदनला प्राण्यांची भीती वाटत नाही.

आ. त्याला कापूर आणि अत्तर यांचे उपाय करायला आवडते.

४. वय ९ मास ते १ वर्ष 

अ. एकदा आम्ही कुटुंबीय कांदळी येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. नंदन प्रवासात जाता-येता झोपला होता; मात्र आम्ही आश्रमात असतांना तो जागा होता आणि शांत होता. तो प.पू. बाबांच्या मूर्तीला पाहून ‘बाबा’ असा आवाज देत होता. तो पादुकांचे दर्शन घेतांना कापराचा सुगंध घेतात, तसा सुगंध घेत होता. जणू त्याला प.पू. बाबांच्या पादुकांमधून सुगंध येत होता.

नंदनचे पालनपोषण करण्याची संधी मिळाल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. शिवानी इंद्रजित वाडकर

इ. ‘त्याला देवतांचे जयघोष ऐकायला आवडतात.

ई. तो घरातील देवघराजवळ गेल्यावर, तसेच त्याने भ्रमणभाषवर देवतांची चित्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर तो लगेच नमस्काराची मुद्रा करतो.’

– सौ. भारती दशरथ वाडकर (चि. नंदनची आजी), पुणे

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ११.१२.२०२४)