५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील चि. वीणा प्रथमेश दाभोळकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. वीणा प्रथमेश दाभोळकर ही या पिढीतील आहे !

१४.२.२०२५ (माघ कृष्ण द्वितीया) या दिवशी चि. वीणा प्रथमेश दाभोळकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला चि. वीणाविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

चि. वीणा दाभोळकर हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. वीणा प्रथमेश दाभोळकर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

अ. ‘मला गर्भधारणा झाल्यावर माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिक प्रमाणात होऊ लागला.

आ. आठवा मास संपायला चार दिवस शिल्लक असतांना मला काही त्रास चालू झाले. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करून प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. या स्थितीतही माझे मन स्थिर होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही नीट करणार आहेत’, अशी माझी पूर्ण श्रद्धा होती. शस्त्रकर्माच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला सतत जाणवत होते.

२. जन्मानंतर

चि. वीणाला जन्मापासूनच देवाची खूप आवड आहे.

२ अ. दुसरा मास : चि. वीणा गुरुमाऊलींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र यांकडे एकटक पहात रहायची. एकदा रात्री ती पुष्कळ रडत होती. तेव्हा आम्ही तिला गुरुमाऊलींचे छायाचित्र दाखवल्यावर ती शांत झाली आणि लगेच झोपली.

२ आ. पाचवा मास

१. ‘श्रीकृष्णबाप्पा’, असे म्हटल्यावर वीणा सगळीकडे बघत रहायची आणि श्रीकृष्णाचे चित्र नजरेनेच दाखवायची.

२. कधी वीणा खूप रडत असली किंवा मस्ती करत असली आणि ‘श्रीकृष्णबाप्पा’, तसेच ‘गुरुमाऊली’, असे म्हटले की, ती शांत होत असे.

२ इ. सात ते दहा मास

१. वीणा रांगायला लागल्यावर देवघरात जाऊन देवतांची चित्रे पहायची. तिला विचारले की, ‘बाप्पा कुठे आहे ?’, तर ती लगेच देवतांच्या चित्रांकडे जायची.

२. आम्ही वीणाला जेवण भरवतांना ‘श्रीकृष्णबाप्पा, गुरुमाऊली, परम पूज्य बाबा’, असे म्हणतो. तेव्हा ती शांतपणे जेवते.

३. वीणाला गुरुमाऊलींचे छायाचित्र दाखवल्यावर ती लगेच छायाचित्राजवळ येते आणि तिच्या बोबड्या भाषेमध्ये छायाचित्राशी बोलते.

४. आम्ही वीणाला मंदिरामध्ये घेऊन गेल्यावर ती शांत रहाते. त्या वेळी तिच्या चेहर्‍यावर भगवंताप्रतीचा भाव दिसतो.

२ ई. अकरावा मास : जानेवारी मासात आमच्या घरी एक पूजा आणि हरिपाठ होता. हरिपाठ चालू असतांना वीणा पूर्णवेळ शांत बसली होती.

२ उ. वीणा जन्मापासूनच श्रीरामाची धून किंवा पाळणा ऐकल्याविना झोपत नाही.’

– सौ. सरोज प्रथमेश दाभोळकर (चि. वीणाची आई), दापोली,  जि. रत्नागिरी. (५.२.२०२५)

________________________________________________

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.