उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. सुधांशू प्रशांत पाटील हा या पिढीतील एक आहे !
चोपडा (जिल्हा जळगाव) येथीलचि. सुधांशू प्रशांत पाटील (वय ४ वर्षे) याची त्याचे आई, वडील आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. गर्भारपणात
१ अ. ‘बेंगळुरू येथील सेवाकेंद्रात गेल्यावर मलापू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत) यांचे दर्शन झाले. त्या वेळी त्यांनी मला नामजपादी उपाय करण्यास सांगितले.
१ आ. बाळाच्या प्रत्येक चक्रावर सूक्ष्मातून नामजपादी उपाय करतांना आनंद जाणवणे : बाळाच्या प्रत्येक चक्रावर सूक्ष्मातून नामजपादी उपाय करतांना मला आनंद जाणवत असे. त्या वेळी ‘बाळाभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला दिसायचे.’
– सौ. जागृती प्रशांत पाटील (चि. सुधांशूची आई), चोपडा, जिल्हा जळगाव.
२. वय – जन्म ते १ वर्ष
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला हात लावून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि छायाचित्राच्या समवेत पुष्कळ वेळ खेळणे : ‘सुधांशू दोन मासांचा असतांना तो ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघून पुष्कळ हसायचा. त्या वेळी त्याला पुष्कळ आनंद होत असे. तो गुरुदेवांच्या छायाचित्राला हात लावून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.’ – श्रीमती कुसुम पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५२ वर्षे, चि. सुधांशूची आजी [आईची आई])
३. वय – १ ते ३ वर्षे
३ अ. देवाची आवड
३ अ १. ‘चि. सुधांशू शाळेत जातांना मार्गावरील मंदिरांना नमस्कार करतो.
३ अ २. मंदिरात जाऊन तीर्थप्राशन करायला पुष्कळ आवडणे : त्याला मंदिरात जाण्याची पुष्कळ आवड आहे. तो पुनःपुन्हा ‘मंदिरात घेऊन चला’, असे सांगतो. आजी-आजोबांनी मंदिरातून तीर्थ आणल्यावर तो लगेचच त्यांच्या मागे धावत जातो आणि तीर्थ घेतो. त्याला मंदिरातील तीर्थ प्राशन करायला पुष्कळ आवडते.
३ अ ३. श्रीकृष्णाप्रति भाव : त्याला श्रीकृष्णाच्या चित्राजवळ गेल्यावर पुष्कळ आनंद होतो. तो श्रीकृष्णाचे चित्र जवळ घेतो आणि त्याच्या समवेत खेळतो. त्याला नामजप करण्यास सांगितल्यावर तो लगेच हात जोडून श्रीकृष्णाचा नामजप करतो.
३ अ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव : त्याला घरात किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर तो लगेचच ‘देव’, असे म्हणतो आणि छायाचित्राला डोके टेकून नमस्कार करतो. त्याला कुठल्याही देवाचे चित्र दाखवल्यावर तो लगेचच हात जोडून डोके टेकून नमस्कार करतो आणि त्या देवाचे नावही अचूक सांगतो.
३ आ. चैतन्य मिळण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे : ‘तो अत्तर आणि कापूर आवडीने लावतो. त्याला चैतन्यमय वस्तूंनी स्वतःभोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण काढण्यास आवडते. घरात कोणाला आवरण काढतांना पाहिल्यावर तोही लगेच स्वतःवरील आवरण काढतो.
३ इ. क्षात्रभाव असणे : त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) पहायला पुष्कळ आवडते.
४. स्वभावदोष : हट्टीपणा, रागीटपणा आणि चिडचिड करणे’
– श्री. प्रशांत भरत पाटील (चि. सुधांशूचे वडील), चोपडा,जिल्हा जळगाव. (११.२.२०२४)
__________________________________________________
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.