सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत ५ नवीन सायबर पोलीस ठाणी

सायबर गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी, तांत्रिक साहाय्यासाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प लवकर चालू करणार – गृहमंत्री

राज्यात ९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकर चालू करून या माध्यमातून सायबर गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शंकर बँकेची माहिती (डेटा) ‘हॅकर’ला पुरवल्याचा पोलिसांना संशय

ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती चोरी होण्याची भीती असेल, तर ते भ्रमणभाषमधून काढून टाका ! – देहली उच्च न्यायालय

जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअ‍ॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.

पोलिसांचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून पैसे काढले

शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्ती यांचे फेसबूक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून त्यांनी पैसेही काढले आहेत.

ऑनलाईन कर्ज देऊन फसवणूक करणार्‍या चौघांना अटक

एका चिनी नागरिकाचा समावेश : चिनी नागरिकांची अशी गुन्हेगारी पहाता भारतीय यंत्रणा निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !

गोवा पोलीस पुरो(अधो)गामी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षा पुरवणार

फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.

केरळ राज्यात आता सामाजिक माध्यमांवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.