कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने २० देशांच्या सूचीमध्ये घातले भारताचे नाव !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाची गुप्तचर संस्था ‘कम्युनिकेशन सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट’च्या सायबर विभागाने कॅनडासाठी वर्ष २०२५-२६ मध्ये धोकादायक असणार्या देशांची सूची प्रसारित केली आहे. यात भारताचा ५ व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे. भारताच्या आधी यात चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांचा क्रमांक आहे. ही सूची कॅनडा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कॅनडा सरकारच्या या सूचीमध्ये भारताचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गुप्तचर संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावामुळे सायबर घटनांना चालना मिळाली आहे. भारत सरकार आधुनिक सायबर कार्यक्रम सिद्ध करत आहे, ज्यामुळे कॅनडाला अनेक स्तरांवर धोका आहे. हे शक्य आहे की, भारत त्याची राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्यासाठी सायबर कार्यक्रम सिद्ध करत आहे. याद्वारे तो हेरगिरी करेल, आतंकवादाचा सामना करेल आणि जगात स्वतःचे स्थान भक्कम करेल.
|