सोलापूर येथे ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर गुन्हे शाखेची धाड

येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्‍या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ११२ जणांवर गुन्हे नोंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात १४४ कलमान्वये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील ११२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

घरफोडी करणार्‍या धर्मांधाला अटक

दिवसा दुचाकीवर फिरून बैठ्या आणि बंद घरांची पहाणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणार्‍या गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून १५ लाख १३ सहस्र १५० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

दिंडोरी (नाशिक) येथे लाखो रुपयांचा अवैध ‘सॅनिटायझर’चा साठा जप्त

तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भिवंडी येथील मशिदीच्या विश्‍वस्तांवर गुन्हे नोंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर गुन्हा नोंद

२१ आणि २२ मार्च या काळात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरील दोन्ही दिवशी ९ लाख ४८ सहस्र ३७४ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.